
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी-प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
कंधार तालुक्यातील बिजेवाडी अर्थातच फुलवळ मध्ये असलेले दत्तगड देवस्थान या दत्तगड देवस्थानी दत्त जयंतीच्या निमित्ताने भव्य यात्रेचे आयोजन व नियोजन करण्यात आले असून यात्रेनिमित्ताने भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दत्त जयंती यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने कंधार तालुक्यातील तमाम सर्व भाविकांना व जनताजनार्धनास विनंती पूर्वक आव्हान करण्यात येते की, प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 07/12/2022 बुधवार रोजी श्री दत्तजयंती सोहळा व यात्रेचे आयोजन दत्तगडावर करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवात पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळच्या सत्रात दत्त मंदिराचे पुजारी अंकुश महाराज गिरी व बाबुराव स्वामी फुलवळकर यांच्या शुभ हस्ते दत्तमुर्तीचा अभिषेक व महापुजा विधी होणार असून सकाळी 10:30 वाजता नांदेड जिल्ह्याचे प्रसिद्ध किर्तनकार “ह.भ.प.पूज्यनीय रंगनाथ महाराज ताटे ” पोखरभोसीकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मौजे बहाद्दरपुरा, फुलवळ बिजेवाडी ,आंबुलगा,गऊळ पानशेवडी कंधारेवाडी चे भजणी साथ देणार आहेत.
दुपारच्या सत्रात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे दायित्व कंधारचे शासकीय ठेकेदार श्री वैजनाथराव सादलापुरे फुलवळकर व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरूडे यांचेकडे आहे.
एवढेच नव्हे तर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा संस्थापक ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी तथा माजी आमदार व खासदार भाई डॉ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या सुविद्य पत्नी यांनी ( माय ) सौ.प्रभावती केशवराव धोंडगे व श्री सुरेश दत्तात्रय पाटील धोंडगे यांच्यावतीने मानाची घुगरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाठवली जाणार आहे , तसेच नेहमी प्रमाणे कंधारेवाडीची पालखी पण येणार आहे.
तरी कंधार तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी व तमाम जनता माय बाप जनार्धनानी दत्त जयंती सोहळ्यासाठी व महाकिर्तन महोत्सवासाठी मोठ्या संखेने उपस्थित रहावे. व सर्वांनीच महाप्रसाद घेण्याचे आव्हान दत्त जयंती यात्रा कमिटीच्या व श्री दत्त संस्थान विश्वस्त मंडळ व पुजारी श्री अंकुश गिरी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.