
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे- संभाजी गोसावी
लोकप्रिय झी.मराठी वाहिनीवरील तुझ्यांत जीव रंगला! या फेम अभिनेत्री पाठक बाई अर्थात अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी ही ऑनस्क्रीन वरील लोकप्रिय जोडी आता खऱ्या आयुष्यांत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत दोघांच्या घरी या लग्न सोहळ्यांची जय्यत तयारी सुरु असून. त्यांचे फोटो दोघेही आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करीत आहेत. साखरपुड्यांच्या सहा महिन्यानंतर दोघे लग्न करणार असून १ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार असा अंदाज लावला जात आहे. अखेर तो अंदाज खरा ठरला पुण्यांतील सिद्धी लॉन्स गार्डन या मोठ्या मंगल कार्यालयांमध्ये अगदी पारंपारिक पद्धतीत हे लग्न सोहळा पार पडणार आहे. तसेच मनोरंजन सृष्टींतील अनेक मंडळींची उपस्थिती असणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठक बाईची प्रेमकथा प्रेक्षकांच्या मना-मनात चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आता हेच पात्र निभावणारे कलाकार वैयक्तिंक खऱ्या आयुष्यांत देखील एकमेकांशी लग्न करणार असल्यांने चाहतेही चांगलेच आनंदित झाले आहेत. त्यांच्या या लग्नांचा अखेर मुहूर्त ठरला आहे. पुण्यामध्ये हा लग्न सोहळा अनेक दिग्गज मनोरंजन सृष्टींतील कलाकारांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीमध्ये विवाह पार पडला. झी.मराठी वाहिनी मधील तसेच अनेक मनोरंजन सृष्टीतील कलावंतांकडूंन शुभेच्छाचा वर्षाव.