
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
गावागावांमध्ये विविध विषयावरची माहिती व्हावी यासाठी वाचनाची सवय लागावी, यासाठी शासनाने अनुदानावर सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. परंतु, काही अपवाद वगळता बहुतांश वाचनालय मुख्य उद्देशाला हरताळ फासत फक्त अनुदान लाटण्यापुरतेच दिसून येत आहेत. देगलूर तालुक्यातील काही असेच गावे आहेत त्या ठिकाणी नाव वर्तपत्र येत आहे. ना काहीच वाचनालयाचे दरवाजे देखील उघड केल्या जात नाहीत. व तसेच दरवर्षी अशा वाचनालयाच्या कारभाराची तपासणी करण्यात येते,परंतु, कोणावरही कारवाई होताना
दिसून येत नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.वाचाल तर वाचाल’ या घोषवाक्याचा नारा देत शासन स्तरावरील विविध अनुदानाचा लाभ घेत ग्रामीण भागात वाचनालयाची स्थापना करण्यात आली. या वाचनालयात थोर पुरुषांची नावे देण्यात आली. स्वयंसेवी संस्था च्या या वाचनालयाला शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान दिले जाते परंतु समाजातील तळागाळापर्यंत थोर महात्मे व तसेच महापुरुषांचे विचार, व तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके दिली जावेत त्यामागचा मोठा उद्देश असतो. परंतु अनेक ठिकाणी वाचनालयाच्या कारभार पारदर्शक चालावा या हेतूने संगणकाचे सोय करण्यात आली आहे. परंतु अनेकांना विरंगुळा म्हणून तर बहुतेकांना माहिती मिळवण्यासाठी वाचनालय लाभदायी ठरू लागले आहेत. मात्र अनेक गावातील त्या ठिकाणच्या संस्थेच्या मनमानी कारभारामुळे वाचनालय अनुदानापूर्ती मर्यादित होत आहेत. त्यामुळे नवयुकांचा हिरमोड होत आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांना पुस्तकाची गरज असते त्यांना तालुक्यात येऊन अभ्यास करावा लागत आहे. वाचनालयाची तपासणी केली जाते मात्र कारवाई केली जात नाही. तपासणी पथक संशयाच्या भवऱ्यात अडकले जात असून ग्रामीण भागातील
वाचनालयाची चौकशी पारदर्शकपणे होणे काळाची गरज आहे. असे तालुक्यातील काही विचारवंत मंडळींचे म्हणणे आहे.