
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील मरखेल येथे
आज दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या मरखेल येथे निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाची( वर्ग १ ते ३ च्या) बैठक संपन्न झाली व तालुकास्तरीय भाषण स्पर्धेत यश मिळवलेले आदित्य पांढरे (लहान गट) व श्रद्धा मचकुरे( मोठा गट) या विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना इयर बुक व परिक्रमा बुक तसेच शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते पालकासह मुलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विविध ऍक्टिव्हिटीज माता पालकांसमोर सादर करण्यात आल्या .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी सूर्यवंशी सर, प्रमुख पाहुणे सूर्यकांत भाकरे सर, भीमरावजी पांढरे, रेणुकाताई श्रीनिवास मचकुरे यासह माता पालक उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक अरुणकुमार वट्टमवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व शाळेतील विविध उपक्रम यासंदर्भात माता-पालकांना सविस्तरपणे विशद केले. बावगे सरांनी निपुण भारत अंतर्गत माता-पालकांनी करावयाच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासमोर सादर केले. मोरखंडे सरांनी कार्यक्रमाचे संचलन व तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत भाकरे, रेणुकाताई मचकुरे यांनी शाळेबद्दल शाळेतील एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व सर्व टीमचे कौतुक केले. बोडावार सरांनी मुलांच्या अभ्यासाकडे मातांनी लक्ष द्यावं असे आवर्जून सांगितले. उमाटे मॅडम व वाडीयार मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.