
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथे आज दिनांक 3 12 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त माननीय भारत निवडणूक आयोग तसेच माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार 01/01/ 202 3 अहर्ता दिनांक वर मतदार यादीचे संक्षिप्त पुनर्निरक्षणाचे काम चालू आहे त्यामुळे जागतिक दिव्यांग दिव्यांग दिनाचे अनुसंगाने दिव्यांग मतदार विमुक्त भटक्या जमातीतील मतदार बेघर मतदार तृतीयपंथी मतदारांची नाव नोंदणीकरण्यात आली. माननीय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राजाभाऊ कदम देगलूर यांनी जे पी नगरकर मूकबधिर विद्यालय देगलूर येथे भेट देऊन दिव्यांग मतदारांचे नमुना नंबर सहा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावतीने भरून घेण्यात आले तसेच खानापूर येथील वैभव निवासी दिव्यांग विद्यालय येथे माननीय तहसीलदार देगलूर राजाभाऊ कदम यांच्या समक्ष दिव्यांग मतदारांचे नमुना नंबर सहा भरून घेऊन थंडीच्या दिवसात थंडीपासून संरक्षण घेण्यासाठी उपदार टोपीचे वाटप करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला रमेश पडलवार व सचिन सुरकुटलावार यांच्या वतीने उपदार टोप्या व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तहसीलदार राजाभाऊ कदम दिव्यांग विद्यालयाची कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पंगे , व महसूल कर्मचारी, ऑपरेटर संदीप कांबळे आदी उपस्थित होते.