
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- शासनाच्या आरोग्य विभागाच्या सर्व योजनांचा लाभ गरजू व गरीब शेतकरी बंधू-भगिनी,गरोदर माता,लहान बालके,अबाल वृद्ध रुग्णांना योग्यरित्या उपचार मिळावा व आरोग्य विषयक शासनाच्या सर्व योजना वरील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय सहाय्यता व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या जव्हार तालुका प्रमुख पदी ॲड.पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे.१ डिसेंबरला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन ॲड.सहाणे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,मुख्यमंत्री वैद्यकीय मदतकक्ष प्रमुख मंगेश चिवटे,उद्योगमंत्री ना.उदय सामंत,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील,पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,खासदार धैर्यशील माने,आमदार प्रताप सरनाईक,बाळासाहेबांची शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण,शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष पत्रकार शरद पाटील,कक्ष प्रमुख राम राऊत,वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख निकी नाईक आदी. या वेळी उपस्थित होते.दरम्यान नवनियुक्त पदाधिकारी यांनी निपक्ष स्वरूपात जात,धर्म,पंत न बघता आलेल्या रुग्णांना निस्वार्थ पणाने रुग्ण सेवा देण्याची प्रतिज्ञा घेतली व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती मी प्रमाणे कार्य करेन.जव्हार मोखाडा तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठया प्रमाणात बोजवारा उडाला आहे.आदिवासी बांधव व इतर नागरीकांना आरोग्यसेवा मिळवून देण्याचे काम करेन.
ॲड.पारस सहाणे
नवनियुक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख जव्हार तालुका प्रमुख