
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-गेल्या प्रदीर्घ काळापासून विकासापासून कोसो दूर असलेल्या शहरातील अल्पसंख्याक बहुल भागात अमरावतीच्या आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने विकासाचे नवे पर्व नांदताना दिसत आहे.मग पायाभूत सुविधांची पूर्तता असो की प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपलब्धता तसेच आता नुकताच मनपाच्या प्राथमिक शाळांना उच्च माध्यमिकची मिळालेली दर्जावाढ असो,आदी बाबींमुळे स्थानिक जनता विकासाच्या प्रवाहात येत असून त्यांचे जीवनमान देखील उंचावत आहे.आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण विकासाच्या मालिकेमुळे अल्पसंख्यांक बहुल भागातील जनता विकासपर्व अनुभवत असल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला .
यास्मिन नगर येथील दया रेहबिलीटेशन – थनाल द्वारे आयोजित निःशुल्क आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे याप्रसंगी आमदार महोदयांच्या हस्ते फीत कापून शिबिराच्या उदघाटनाची औपचारिकता साधण्यात आली.यासोबतच थनल ट्रस्टच्या समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके,माजी नगरसेवक-इमरान अशरफी,डॉ.करीम शाह,अरशदखान,सईदखान मोहम्मदी,डॉ.बासित,इकरा हॉस्पिटल,केरळचे डॉ.अबु शान, सुदर्शन सर,हाफिज सईद,यश खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.शहराच्या पश्चिमी क्षेत्रात असलेल्या मनपाच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आधी केले व मग सांगितले याची प्रचिती आणून देत स्थानिक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा लाभ व्हावा.याकरिता भरीव योगदान दिल्याबद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांचा स्थानिकांच्या वतीने शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यास्मिन नगरसह आजूबाजूच्या परिसरात भौतिक,शैक्षणिक,आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला घेऊन आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.या भागातील सर्व पालकांची अपेक्षा होती की,आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे.ही बाब लक्षात घेऊन आपण मनपा स्तरावर आढावा बैठक घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे प्रस्ताव सादर करीत महापालिका शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचा मुद्दा लावून धरला होता.यासोबतच मनपाच्या शाळांची पाहणी करण्यासाठी गेल्यावर असे निदर्शनास आले की,इमारती,शिक्षकवृंद आदी उपलब्धी असल्यावरही या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना-पालकांना अपेक्षेनुरूप आधुनिक शिक्षणाची सोय नसल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मनपा उर्दू माध्यमिक शाळेत विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी,याकरिता शासनाचे लक्ष वेधून सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती.या प्रस्तावाला नुकतीच मान्यता प्राप्त झाल्याने आता जमील कॉलोनी परिसर स्थित मनपाच्या उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता अकरावी व बारावीचे विज्ञान शाखेचे वर्ग सुरू होणार आहे.यासोबतच पाच उच्च प्राथमिक शाळांमध्ये उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू होण्याचा मार्ग सुकर झाल्याने अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची वाट सुद्धा प्रशस्त झाली आहे.तसेच स्थानिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी असिर कॉलोनी येथे मनपाचा दवाखाना सुरू करण्यासह तिथे अद्यावत व अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.जनतेचे लाभणारे सहकार्य व आशीर्वाद असेच कायम राहावे,असा मानस व्यक्त करीत आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी सत्काराला घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी केरळ मधील डॉक्टरांच्या टीमचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी सुद्धा थनाल ट्रस्टच्या विविध सेवाभावी उपक्रमाची प्रशंसा केली.मनपाच्या शाळेत नर्सरी,केजी -वन सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आता इयत्ता दहावी-अकरावी चा प्रस्ताव नुकताच मान्य झाल्याने आता नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मागणीची पूर्तता झाली आहे.यासोबतच मनपाच्या शाळेत मनुष्यबळ अभाव लक्षात घेता,याकरिता शासन-प्रशासन स्तरावर करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित बघता ही बाब सुद्धा निकालात निघाली आहे.आगामी काळात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांना अपेक्षित कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येणार आहे या शब्दात संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले.तर माजी नगरसेवक-इमरान अशरफी यांच्यासह मान्यवर अतिथींची सुद्धा समायोजित भाषणे झालीत.आतापर्यंत स्थानिक नागरिकांनी केवळ आश्वासनेच अनुभवली होती.परंतु आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी विकासाची प्रचिती घडवून आणली असल्याचे सांगून माजी नगरसेवक इमरान अशरफी यांनी त्यांचे अभिनंदन केले.दरम्यान निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिरात यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना औषधीचे वितरण सुद्धा करण्यात आले.आरोग्य अबाधित राखण्यासाठी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यासह औषधीचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी.तसेच आहार,व्यायाम आदिसह अन्य बाबीना घेऊन वैद्यकीय चिकित्सक यांच्या वतीने गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना यावेळी मार्गदर्शन करताना महत्वपूर्ण माहिती पण देण्यात आली.
यावेळी सनाउल्ला खान ठेकेदार,हबिबखान ठेकेदार,सादिकभाई आयडिया,सय्यद साबीर,वहिद शाह,इक्बाल साहिल,अबरार मोहम्मद साबीर,शफ्फु भाई,शब्बीर शाह,मीर्जा एजाज बेग,अब्दुल सत्तार राराणी, अजमत पठाण,नईमभाई चुडीवाले,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत,अबरार साबीर,प्रथमेश बोके सामी पठाण,इर्शाद पठाण,अयाज खान,मतीन राज,मोहसीन अहमद,सलमान एटीएस,अहमद शेख,शेख जाबिर,जावेद शाह,शेख परवेज,शेख अमीन,मोहम्मद शारीक,जहिरोद्दीन भाई,शेख नाजीम,शेख परवेज,पूजा कांबळे,सीमा मॅडम,फारीदा मॅडम,एजाज मंत्री तसेच थनल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व अन्य सहकारी,आमंत्रित सदस्य,ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने या उपक्रमाला उपस्थित होते.