दैनिक चालू वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा मोसा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड,पंचायत समिती सदस्य बाबाराव राठोड यांची उपस्थिती होती. गुळखंड तांडा मोसा ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली. सरपंचपदी विष्णू आडे, उपसरपंचपदी भीमराव राठोड, सदस्य म्हणून चंद्रप्रकाश आडे, गोदावरी आडे,काळू राठोड, रावसाहेब राठोड,भागवत मातने, अनिता चव्हाण आदींची बिनविरोध निवड झाली. गुळखंड तांडा मोसा ग्रामपंचायतला विकासासाठी आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. उबाळे, कैलास आडे, विलास आडे, महादेव राठोड, भाऊराव आडे, प्रदीप आडे, दिनकर मातने, देविदास राठोड यांची उपस्थिती होती.
