
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
हिमायतनगर प्रतिनिधी:-मौजे वारंगटाकळी येथील नवविवाहितेने सासरमधील मंडळीच्या जाचाला कंटाळून राहत्या घरातचं सौ.मोनिका लक्ष्मण देवकते वय १८वर्षे हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना दिं.०२डिसेंबर रोजी घडल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजलीआहे.मौजे वारंगटाकळी येथील नवविवाहितेचे वडील नामे शिवाजी मोहन मस्के वय ४२वर्ष रा.सायाळ ता.जि.हिंगोली यांच्या फिर्यादीवरून नवविवाहितेच्या सासरकडील एकूण आठ जणा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.यामध्ये लक्ष्मण मारोती देवकते पती,मारोती देवकते सासरा,सौ.लक्ष्मीबाई देवकते सासु, कोमल मस्के नंदन,बालाजी देवकते भाया,सौ.पूजा देवकते जाऊ,तानाजी देवकते चुलत सासरा,सौ.राधाबाई देवकते चुलत सासू रा.सर्व मौजे वारंगटाकळी यांच्याविरुद्ध गुन्हा र. नं.२७२/२२भांदवी ३०४(ब)४९८(अ) आयपीसी अक्ट ३४व हुंडा प्रतिबंधक कायदा०४प्रमाणे दिं०२ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याची नोंदआहे. वरीलआरोपीने संगणमत करून लग्नातील राहिलेली उर्वरित रक्कम आणि घर बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या पैशाची मागणी करून मयत सौ.मोनिका हिस शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळेचं गळफास घेऊनआत्महत्या केलीआहे.व तिच्या मरणास वरील आठ जण कारणेभूत असल्याचे फिर्यादीत म्हटलेआहे. वरील फिर्यादी वरुन पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी गुन्हा दाखल केलाआहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्याकडे दिलेलाआहे.या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजलीआहे.सदरील नवविवाहितेचे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.तालुक्यात मोठ्या प्रमाणात विवाहित स्त्रिया व मुलींना शारिरीक छळ,मानसिक त्रासाला कंटाळून जिवन संपवण्याच्या घटनेत वाढ होत आहे.याकडे कुटुंबातील सदस्यांनी लक्ष देणं गरजेचं झालंआहे.यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतआहेत.