
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील आय.एस. ओ.मानाकिंत रा जि प आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेत २ डिसेंबर २०२२ रोजी रोजी शालेपयोगी दप्तरे एकुण १२० दप्तरे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
देशातील ३२ राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणारी दिल्ली येथील गूंज या सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी राठोड यांनी संस्थेचे प्रतिनिधी मयूर नाक्ती यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले याचबरोबर एसएमसी समिती सदस्य व ग्रामस्थ यांचे हि स्वागत केले.संस्थेचे सदस्य यांनी गूंज संस्थेचे दिल्ली येथील सामाजिक संस्थेचे देशांमध्ये जे विविध सामाजिक, शैक्षणिक,कृषी विषयक,तसेच जलसंधारण विषयक उपक्रम चालू आहेत त्याची माहिती दिली संस्थेचे प्रमुख अंशू गुप्ता यांच्या संकल्पनेतून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सक्षम व्याक्तीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे ही भावना बोलून दाखवली.
या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून कृती करून घेतल्या तसेच शाळेच्या भौतिक गरजेच्या पूर्ततेसाठी यापुढे संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य करू असे संस्था सदस्य मयूर नाक्ती यांनी सांगितले.
मयूर नाक्ती यांनी मनोगत सांगितले की सध्या पार पडलेल्या तालुका स्तरीय, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर या खरसई शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी क्रिडा प्रकारात केल्याने विशेष कौतुक केले.
यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आवर्जून उपस्थित होते. शाळेचे शिक्षक अशोक सानप यांनी शाळेची शैक्षणिक माहिती गूंज संस्थेला दिली. तर कार्यक्रमाचे आभार जयसिंग बेटकर यांनी केले.