
दैनिक चालू वार्त्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
दि.29/11/2022 रोजी रायगड जिल्हा 14,17,19 वयोगटातील मैदानी क्रीडा स्पर्धा HOC रसायनी,ता.खालापूर येथे पार पडल्या या स्पर्धेत को.ए.सो प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसुरी ता.म्हसळा या शाळेचा विद्यार्थी 17 वर्षे वयोगट- कु.स्नेहांत संजय डांगे – 5 कि.मी चालणे या क्रीडा प्रकारात याने स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला .व सदर विद्यार्थ्याची मुंबई विभागीय मैदानी स्पर्धेसाठी 5 कि. मी चालणे या स्पर्धेमध्ये निवड झाली आहे .कु.स्नेहांत आणि त्याचे त्याचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. देवराम डावखर सर यांचे क्रीडा समिती म्हसळा, शाळा समिती सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्या देण्यात आल्या.