
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमानंतर या देशाला अमूल्य असं भारतीय संविधान दिलेलं आहे . भारतीय संविधानामध्ये स्त्री-पुरुष, जात, धर्म ,भाषा असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा समान अधिकार सुद्धा दिलेला आहे. बाबासाहेब भारतीय मतदारांना उद्देशून म्हणतात की “मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे .तुम्हाला मिळालेला हा अधिकार तुम्ही जर पैसेवारी विकत असाल तर तुमच्या शिवाय दुसरा आत्मद्रोही कोणी नाही”. निवडणुका लागल्या की अनेक पक्षाचे उमेदवार लोकांना वेगवेगळे खोटी आश्वासने देऊन फसवतात . पैशाच्या जोरावर मताचा मिळालेला राष्ट्रीय अधिकाराचा गैरवापर करून मतदारांना विकत घेतात. काही सुजाण मतदार वगळता अनेक मतदार खोटे आश्वासनांना आणि पैशा च्या आमिषाला बळी पडतात .आणि एकदा विकला गेलेला मतदार हा त्या विषमतावादी ,जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढू शकत नाही. हे ओळखून बाबासाहेब असे म्हणतात ” लढला नाही तरी चालेल परंतु विकल्या जाऊ नकोस” एवढे महान विचार बाबासाहेबांनी इथल्या भारतीय नागरिकांना दिलेले असून सुद्धा त्यांचे विचार बहुतांश पायदळी तुटवल्या जातात असे दिसून येते . याचं मनाला दुःख वाटते. काही स्वाभिमानी मतदार वगळता अनेकांना आपल्या मताची किंमत कळलेली नाही. यासाठी एक उदाहरण देतो. एका निवडणुकीच्या वेळेस एक उमेदवार मत मागण्यासाठी गावातील एका एका वृद्ध व्यक्तीजवळ गेला आणि म्हणाला, ” बाबा, हे घ्या 1000 रु. आणि यावेळेस मलाच वोट( मतदान) करा.” यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, ” बेटा, मला पैसे नको. तुला वोट पाहिजे असेल तर एक काम कर, मला एक गाढव आणून दे.” उमेदवाराला वोट पाहिजे होते .त्यामुळे तो गाढवाच्या शोधात निघाला. सारा परिसर पालथा घातला पण कुठे ही त्याला 20 हजार रुपयांच्या खाली गाढव काही मिळाले नाही. तो वापस त्या वृद्ध माणसाजवळ आला आणि म्हणाला, ” बाबा, गाढवाची किंमत तर खूप जास्त आहे. स्वस्तातील गाढव कोठे ही मिळेना, मी आपणांस गाढव काही देऊ शकत नाही. ” यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, ” मग मला वोट मागून शरमवू नका. तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे. जेंव्हा गाढव 20 हजार पेक्षा कमी किमतीत विकत मिळत नाही .तर मी तर एक माणूस आहे, भारतीय मतदार आहे .मी कसा एक हजार रुपयांत स्वतः ला विकू शकतो. त्या वृद्ध मतदाराचे खडे बोल ऐकून उमेदवार खजील झाला आणि निघून गेला. म्हणून भारतीय मतदारांनो लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वतःच्या मताची किंमत ओळखा. जागे व्हा..
सिद्धार्थ अशोक तायडे
मु. पो. वडनेर भोलजी
ता. नांदुरा .
जि बुलढाणा .
लो
मो .नं.9309767388