
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्तीची अंतिम तारीख 31 /12 /2022 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने या शैक्षणिक शिष्यवृत्ती सन 22/23 या शैक्षणिक वर्षासाठी कामगारांच्या पाल याकरिता शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस , मुंबई गिरणी कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत मंडळाच्या कामगार कल्याण निधीचा वर्गणी भरणाऱ्या आणि गतवर्षी किमान 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या कामगारांच्या पाल्यास ही योजना लागू करण्यात आली आहे यात राज्य परिवहन वीज कंपनी, सव बँक, साखर कारखाने, खत कारखाने, सूतगिरणी, आयुर्विमा महामंडळ, कापूस पणनन, महाबीज महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आधी आस्थापनातील कामगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वैद्यकीय लाभ, एम एस सी आय टी शिष्यवृत्ती , पाठ्यपुस्तक अर्थसहाय्या , परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, साहित्यविषयक, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, योजना विद्यार्थ्यांना त्याचा पालकाचे माहे जून 2022 चे पगार स्लिप. उत्तीर्ण वर्गाच्या गुणपत्रिका सत्यप्रत राशन कार्ड शिकत असलेल्या वर्गाचे बोनाफाईड मूळ संचिका व प्रमाणपत्राची कागदपत्रांची पूर्तता करणे या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक आहे अधिक माहितीसाठी व आजच जवळच्या कामगार कल्याण शी संपर्क व ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येईल असे आव्हान कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस साहेब व कामगार कल्याण केंद्र देगलूर येथील कर्मचारी व्ही बी स्वामी यांनी केले आहे.