
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – भरत पवार
आज दि.5.डिसेंबर रोजी दत्त देवस्थान डोंगरगाव ता.लोहा.येथे पं.पुज्य.श्री.गुरु मुर्ती परलोकी महंत1008बळीगीर गुरु मोहनगीर महाराज यांच्या 29 व्या पुन्यतिथी निमीत्त नामस्मरन,अन्नदान,महापुजा व भव्य नेत्र तपासनी शिबीराचं आयोजन करन्यात आल्याची माहीती मठाधिपती गुरु कैलासगिर महाराज यांनी दिली.
कार्यक्रमाची रुपरेषा अशी की. सकाळी 10.00वा.नेत्र पासनी शिबीर11.00 वा.समाधी अभिषेक,दिवसभर महाप्रसाद व रात्री9.ते पहाटे 5 पर्यंत 128 श्रीफळ व सव्वा खंडी तांदळाची महापुजा व मंगळवारी सकाळी ठीक सहा वाजता काकडा आरती होईल.या महापुजा विधीवर दाताळा,भुत्याची वाडी,हदगाव,पिप्री झोला,मरडसगाव,मंगलसांगवी,गोगदरी,दहीकळंबा,डोंगरगाव येथील भजनी मंडळ उपस्थीत राहनार आहेत.या सोहळ्यात योग असा की,महाराष्ट्रातील माहुर सह अनेक संस्थानचे संत मंहंत येनार असुन भावीकांना एकाच वेळी सर्व गुरुवर्यांच्या दर्शनाचा लाभ घडुन येनार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत गुरु अवधुतगिर महाराज व आयोजक मठाधिपती गुरु कैलासगिर महाराज असनार आहेत .व सेवेसाठी समस्त गावकरी मंडळी व दत्तभक्त असतील तरी या महा याेगाचा सर्व दत्त भक्तांनी लाभ घेन्याचे आव्हान गुरु कैलासगिर महाज यांनी केले.