
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
**************************************
नांदेड दि.03 डिसेंबर, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री निकेतन हायस्कूल, दिपक नगर, नांदेड येथील विद्यार्थ्यी सहभागी झाले आहेत.आज दि.03 डिसेंबर 2022 रोजी आट्यापट्या या खेळामध्ये 14 व 17 वयोगटातील मुली प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच 14 व 17 वयोगटातील मुले द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या यशाचे कौतुक व अभिनंदन श्री निकेतन हायस्कूलचे सचिव श्री कपिल नरवाडे साहेब, सहसचिव डॉ सौ एस एन राऊत मॅडम, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर, क्रीडा शिक्षक श्री मोगल ए के, श्री कळकेकर पी जी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.