
दैनिक चालू वार्ता नांदेड- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
सिम्बॉल ऑफ द नॉलेज , अथांग ज्ञानाचा महासागर , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने संपूर्ण जगभरामध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्याच अनुषंगाने नांदेड शहरात विविध शाळा , कॉलेज , महाविद्यालया सह भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नवीन कौठा नांदेड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे , शालेय समिती सदस्य मा. सूर्यकांत कावळे , कॉलेजचे मा.उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे कौठा इन्चार्ज प्रा..सय्यद जमील यावरील प्रशासकीय मान्यवराच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी परीक्षा विभाग प्रमुख स्वाती कान्हेगावकर , ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड , कौठा शाखेचे प्रा. लुंगारे ज्ञानेश्वर , प्रा.श्रीवास्तव दीपक , प्रा.गोविंद मोरे , प्रा. शिवानंद सोनटक्के , प्रा. योगेश दिग्रसकर , प्रा. संगीता स्वामी , प्रा.देशमुख शिवशंकर इत्यादी सह माणिक नगर शाखेतील सर्वच ज्येष्ठ प्राध्यापक बंधू व भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे यांनी केले.