
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अशीच मनाला हदरवणारी एक धक्कादायक घटना औरंगाबादच्या पैठण शहरात आज सकाळी समोर आली असून, पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीच्या डोक्यात फावड्याने मारहाण करून पत्नीला जागीच संपवून पती फरार झाला आहे. आज सकाळी सात वाजता ही घटना समोर आली असून, घटनास्थळी पैठण पोलीस दाखल झाले आहेत. त्यामुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून, मंदा पुंडलिक पौळ असे मृत महिलेच नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ हा वीट भट्टी कामगार होता. दरम्यान मंदा पौळ यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले होते. मात्र नेहमी दोघांमध्ये जमत नसल्याने तीन वर्षांपूर्वी ते विभक्त झाले होते. त्यामुळे मंदा या कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह करायच्या. तर त्यांना तीन मुलं आहेत. पण विभक्त राहून देखील ज्ञानेश्वर हा मंदा यांच्यावर संशय घेऊन त्यांना सतत त्रास देत होता. एवढचं नाही तर अनेकदा वाद घालत होता.
पैठण शहरातील नेहुरू चौकात एका महिलेच्या डोक्यात फावडे टाकून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महिलेला पैठण येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. तर पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध घेण्यात येत आहे.