दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर : – कळका ता.कंधार येथील सामान्य कुटुंबातील सुशिक्षित असलेले राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व समाजातील प्रश्नांची जडणघडण शासनाच्या नजरेत आणून देणारे कंधार तालुका प्रतिनिधी मा. बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख. “

– कंधार तालुक्यातील कळका येथे शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म ७ डिसेंबर रोजी झाला.वडीलांचे नाव मारोती पाटील व आईचे नाव रेजाबाई आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शा.कळका येथे व माध्यमिक शिक्षण संजय गांधी हायस्कूल कलंबर आणि उ.मा.शिक्षण मनोविकास विद्यालय कंधार येथे झाले आहे.त्यांनी १९९० साली राजकारणात प्रवेश केला.ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी आजीवन सदस्य आहेत. त्याकाळी शिवसेना आणि भाजपाची युती होती.त्यामुळे त्यांनी दोन्ही पक्षांचे कार्य केले आहे.त्यानी मोठमोठ्या नेत्यांच्या सानिध्यात राहून आपले समाज कार्य वाखान्याजोगे केले .स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब,स्व.प्रमोदजी महाजन साहेब,स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब,स्व.शंकरराव चव्हाण साहेब,स्व.शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर साहेब,स्व.निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले .त्यानंतर त्यांनी श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासाठी पेठवडज सर्कल च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचे काम केले आहे.तेंव्हापासून ते एकनिष्ठ विश्वासू श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे जूने कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांचे मामा श्री.विनायकराव कदम साहेब यांनी व कै.देवराव पाटील जाधव पिंपळदरीकर सरपंच यांनी श्रीमती मुद्रीकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड यांना विनंती करून संजय गांधी ज्यूनिअर काॅलेज कलंबर येथे नौकरी लावली.संस्थेचे अध्यक्ष श्री.मारोतीराव पाटील घोरबांड साहेब यांच्या आशीर्वादाने ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांचे विश्वासू व एकनिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. कळका येथील दोन तीन धोकेबाज पुढाऱ्यांनी त्यांचे कंधार भवानीनगर येथील घर व कळका येथे नंतर विकत घेतलेले शेत जमीन मिळू दिले नाही.त्यांना आता कळून चुकले असून त्यांच्या पापाचे फळ त्यांना मिळाले आहे.ते भोग भोगीत आहेत.माजी सरपंच गोविंदराव पाटील गायकवाड यांनी त्यांना सहकार्य करून धीर देण्याचे काम केले आहे.त्यांना एका देवमाणसाची भेट झाली ते देवमाणूस म्हणजेच दैनिक चालू वार्ता पेपर पुणे चे मुख्य संपादक श्री.डि.एस.लोखंडे पाटील मजरेधर्मापुरीकर साहेब यांची त्यांनी दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली.त्या संधीचे सोने करण्याचे काम बाजीराव पाटील यांनी केले.पेठवडज सर्कल मधील अनेक ठिकाणी अन्यायाविरुद्ध आवाज उठविला .त्यांना धमक्या दिल्या गेल्या.ते कोणासमोर झुकले किंवा डगमगले नाहीत .त्यांना दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक लोखंडे पाटील साहेब व कंधार पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ,पि.एस.आय.,व सर्व पोलीस कर्मचारी यांनी पाढबळ दिल्यामुळे ते कंधार तालुक्यातील लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित आहेत.त्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, निराधार, दिव्यांग, लाभार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान ,मानधन, शिष्यवृत्ती, योजनेचे कामे करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यांचे कार्य पाहून दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक लोखंडे पाटील साहेब यांनी त्यांचे प्रमोशन करून कंधार तालुका ग्रामीण पत्रकार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.ते नेहमी सार्वजनिक क्षेत्रातील विविध मागण्या करत असतात.त्यामध्ये विज, पाणी रस्ते ,पिक विमा, पावसाने झालेले नुकसानभरपाई, पिक कर्ज वाटप, फळबाग वाटप इत्यादी कामे करून गरीबांची मदत करीत असतात.त्याचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त दैनिक चालू वार्ता परीवाराच्या वतीने दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी नतमस्तक होतो.व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

…………….
लक्ष्मण रोहीदास कांबळे
उस्माननगर ता. कंधार
