
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील तळणी येथील किशोर खंदारे मित्र मंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निवेदनात असे म्हटले आहे की
सन २०२२ मधील सर्व शेतकऱ्याचे शेतीचे विज बिल राज्य सरकारणे भरणे व शेतकऱ्यांची शेतीची विज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी .
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की शेतकऱ्याचे आतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. महावितरण कंपणीकडून विजबिलाची वसुली करण्याची मागणी करण्यात येत आहे. महावितरणकडून शेतीची विज तोडणी व डिपीसहीत खंडीत करणे सुरु आहे. शेतकरी आर्थीक संकाट सापडला आहे.
शेतकऱ्यांना धिर देण्याचे काम राज्य सरकारने करावे. मालाला भाव नाही, शेतकरी मोडकळीस येत आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्याचे विज बिल राज्य सरकारने भरावे व शेतीचे विज तोडणी तात्काळ थांबवावी. आशी मागणी तळणी सर्कल व मंठा तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. तरी आपल्या स्तरावरून उचित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. या निवेदनावर किशोर खंदारे, बाबासाहेब खंदारे,किरण खंदारे,सदाशिव मापारी, एकनाथ खंदारे,दिनकर खंदारे, मधुकर खंदारे, भागवत खंदारे, भीमसन बोराडे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या होत्या.