
दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- दर्यापूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहिर झाला असून दि.२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत चार दिवसाचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी देण्यात आला होता.या निवडणुकीत सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असून तालुक्यातील २५ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तब्बल १२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तसेच १८३ ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी एकूण ३८४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.शनिवार व रविवार सुट्टी असून दि.५ व ६ डिसेंबर पर्यंत अर्जाची छाननी होनार असून दि.७ डिसेंबर रोजी दुपार पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे,त्यानंतर लगेच दुपारी रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारांना पसंतीचे चिन्ह वाटप होणार आहे.सदर २५ ग्रामपंचायत करिता १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.यामध्ये दर्यापूर तालुक्यातील चांडोळा,पिंपळखुंटा,टाकळी,नायगाव,म्हैसपूर मोचरडा,चंद्रपूर,सांगावा बु.,वडुरा,पेठ इतबारपुर,जसापुर खैरी,हिंगणी मिर्झापुर,गोळेगाव,सुकळी,घोडचंडी,बेलोरी,माटरगाव,घडा,महिमापूर,डोंगरगाव,नरसिंगपूर,एरंडगाव,तेलखेडा,कोळंबी,गायवाडी अशा २५ ग्रामपंचायतचा समावेश आहे.दर्यापूर येथील तहसिलदार डॉ.योगेश देशमुख हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहत असून तालुक्यातील विविध विभागाचे कर्मचारी सहायक म्हणून काम पाहत आहेत.
—————————————-
सरपंच पदासाठी आरक्षण…
चांडोळा येथील सरपंच पदाचे आरक्षण मागास प्रवर्गासाठी राखीव असून,पिंपळखुंटा अनुसूचित जाती,टाकळी सर्वसाधारण,नायगाव सर्वसाधारण,म्हैसपूर मोचर्डा सर्वसाधारण महिला,चंद्रपूर सर्वसाधारण,सांगावा बु. सर्वसाधारण,वडुरा अनुसूचित जाती,पेठ इतबारपुर अनुसूचित जमाती,जसापुर सर्वसाधारण महिला,खैरी सर्वसाधारण,हिंगणी मिर्झापुर नागरिकांचा मागास प्रवर्ग,गोळेगाव अनुसूचित जमाती महिला,सुकळी अनुसूचित जाती,घोडचंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग,बेलोरा अनुसूचित जाती महिला,माटरगाव सर्वसाधारण महिला,घडा अनुसूचित जाती,महिमापूर सर्वसाधारण,डोंगरगाव सर्वसाधारण महिला,नर्सिंगपूर सर्वसाधारण महिला,एरंडगाव अनुसूचित जाती,तेलखेडा नागरिकांचा मागास प्रवर्ग,कोळंबी सर्वसाधारण महिला,गायवाडी अनुसूचित जाती
—————————————-