
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अस्थिकलश दर्शनाकरिता अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती ते नया अकोला अशी जवळजवळ १८ कि.मी. पदयात्रा आयोजित करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन करण्याकरिता हजारोंच्या संख्येने नागरिक या आगळ्यावेगळ्या पदयात्रेत सहभागी झाले.नया अकोला येथे दाखल होताच मा.आ.बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत महामानवांच्या अस्थींचे दर्शन घेतले.नया अकोला येथे आयोजित सभेत सर्व प्रमुख अतिथींचे संविधान ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार व तत्वानुसार देश चालणे गरजेचे आहे असे मत ठामपणे मांडले व मनुवादी सरकारचा जाहीर निषेध नोंदविला.यावेळी मा.आ.बाळासाहेब थोरात,मा.आ.यशोमती ठाकूर,मा.अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख (अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अमरावती),डॉ.सुनील देशमुख (माजी पालकमंत्री),आ.बळवंत वानखडे (दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा),माजी.आ.वीरेंद्रजी जगताप,मा.सुधाकरभाऊ भारसाकळे (अध्यक्ष जिल्हा मध्य.सह.बँक अमरावती),मा.दिलीप एडकर (संपादक),मा.हरिभाऊ मोहोळ,जयंतराव देशमुख तसेच अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या सभेला उपस्थित होते.