
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:- दि.०६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर नांदेड येथे साजरा केला गेला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री.विजय गोविंदवार सर, प्रमुख पाहुणे माननीय माजी मुख्याध्यापक श्री. प्रमोद शिरपूरकर सर व सहशिक्षिका सौ.देशमुख मॅडम ह्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बी. एड. छात्रध्यापक सौ.माधवी सरवदे व सौ.रुपाली आचलकर यांनी सूत्रसंचालनाचे कार्य पार पाडले. सिमरन उगीरवाले, मोनिका एकलारे, सपना सोनटक्के, ऋचा देशपांडे, संजीवनी लोंढे, आरती काळे, संध्या पाईकराव, नारायण गायकवाड यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.