
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:राज्याच्या कृषी आयुक्तांना निवेदन
जुलै, आँगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाने केलेल्या अंतिम नुकसानी अहवालानुसार शासनाने दुष्काळी जाहीर करून अनुदानही वाटप केले. पण पीकविमा कंपनीने 25 टक्के अडव्हान्स पीकविम्याच्या नावाखाली अत्यंत तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. पीकविमा प्रश्नाचे अभ्यासक व शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी आज पुणे येथे राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांची भेट घेऊन पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांचा पीकविमा तात्काळ अदा करण्याचे आदेश द्यावे असे निवेदन दिले.