
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
प्रयाग चिखली येथून २७ नोंव्हेबर पासून श्री दत्त
जयंती निमित्य निघालेली पायी दिंडी आज कोणाळी या गावात पोहचली.या गावात स्वामी समर्थ पायी दिंडीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत करणेत आले.रात्री श्री स्वामी समर्थचे भजन,नामस्मरण करून रात्रीचा मुक्काम करून सदरची दिंडी सकाळी कोन्हाळी हून अक्कलकोट कडे मार्गस्थ झाली.कोल्हापूरचे दिंडी प्रमुख विश्वास पाटील तसेच चव्हाण सर व त्यांचे सहकारी यांचे नेतृत्वाखाली हि दिंडी कोन्हाळी गावच्या हद्दीत श्री स्वामी समर्थ विसावा मंदिरचे संस्थापक प.पू.राजेंद्र.सुरवसे महाराज यांजे कडून आलेल्या सर्व भक्तांजी सोय करणेत आली.
सदर दिंडीत इंगळी येथील स्वामी समर्थ भजनी मंडळीचे कार्यकर्ते सदर दिंडीत सामील होऊन अक्कलकोट प्रर्यंत पायी दिंडीत सामील झाले होते.दिवसभर पायी प्रवास करून ही दिंडी अक्कलकोट येथे पोहचली.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्तात्रेय जयंती मोठ्या प्रमाणात साजरी कली जाते.
या दिंडी सोहळ्यात कवि सरकार इंगळी,संदिप चौगुले,सुभाष भोसले,पिंटू मर्दाने,जिनेंद्र देसाई,सुभाष गुरव,अनिल दानोळे(दिवाणजी), बाळू सुतार,अनिल जावेद,खैरे मामा हुपरी,सुरेखा डंके नांदणी,प्रणोती पवार,सौ भोंसले व अन्य भक्त मंडळी उपस्थीत होते.