
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सिमाडोह रायपूर मार्गावरील तलावाजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास काही वन पर्यटकांना बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सदर माहिती उपस्थित काही नागरिकांनी तात्काळ वन विभागाला कळवली.सिमाडोह परिक्षेत्रातील रायपूर मार्गावरील वनखंड क्रमांक १७९ मध्ये रस्त्याच्या ५० मीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पाचा तलाव आहे.त्यानजिक हा बीबट मृत अवस्थेत आढळून आला.परंतु याअगोदर सुद्धा एक अस्वल मृत अवस्थेत आढळून आला असता आता त्याच पाठोपाठ बिबट सुद्धा मृत अवस्थेत आढळून आले.शासन वन्यजीव संरक्षणासाठी तसेच अभयारण्यासाठी करोडो रुपये खर्च करते.अशातच वन्य प्राण्यांचा मृत्यू कसा होतो? त्यांना शिकार तर बनवले जात नाही ना?तसेच मेळघाट वनविभाग ह्या पार्श्वभूमीवर करते तरी काय?असे गंभीर प्रश्न वन्य पर्यटकांना पडला आहे.तसेच मृत प्राण्यांचा कुठलाही अहवाल येथील वन्य प्रशासनाने मीडियासमोर सादर न केल्यामुळे वन्य प्राण्यांचा मृत्यू का बर झाला?आणि कशामुळे झाला?हे अद्याप सुद्धा सामोरे आले नाही.येथील वन कर्मचारी शासनाचा पगार घेऊन शासनाला गंडवत तर नाही ना?असे सुद्धा येथील पर्यटकांना तसेच नागरिकांना प्रश्न पडला आहे.तसेच झालेल्या घटनेनुसार वन्य प्राण्यांची तसेच अभयारण्याची सुरक्षा धोक्यात असल्याचे समजते.
—————————————-
तोंडातून फेस;विषबाधा की खेळताना पडला?
बिबट बेशुध्द असल्याची शंका निर्माण झाली असता तो बिबट मृत असल्याची चर्चा पर्यटकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये रंगली असताना तो बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी दिली.बिबटच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात फेस आला असल्याने खेळताना झाडावरून पडल्याने बेशुद्ध झाला की नजीकच्या तलावात असलेल्या पाण्यात कुणीही शिकार लावल्यामुळे बेशुद्ध पडला?याची माहिती आता उघड होणार आहे.
—————————————-
—————————————-
सिमाडोह नजीक बिबट बेशुद्ध अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.मी घटनास्थळी जात असून त्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट होईल कमलेश पाटील,सहाय्यक वनसंरक्षक,सिपना वन्यजीव विभाग परतवाडा
———————————-——