
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
वन्नाळी ता देगलुर येथील श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता देगलुर येथे
महामानव बोधीसत्व,ज्ञानाचे महासागर परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्य अभिवादन करण्यात आले.
महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात केली.सोफिया सय्यद,कावेरी बामणे,रोहन बोयावार,शेख सिमरन,नेहा पठाण, भाले वर्तिका,अबिद पठाण, शुभम इबितवार,प्रेमला वाघमारे, प्रियंका बामणे, समिक्षा कोरेवार,पार्वती येशमवार,रोहिणी काळेकर अदि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री.शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीचे मुख्याध्यापक,सुरेश वनंजे सर यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाध्यापक बालाजी पेटेकर यांनी केले तर आभार आनंद दिमलवाड यांनी मानले.याप्रसंगी विठ्ठल वाघमारे,माधव कदम,धनाजी पाटील,आनंद दिमलवाड,दिगंबर खिसे,बालाजी पेटेकर,अंजली देशमुख,बालाजी बारडवार,दिलिप पाटील, मारोती अंकमवार व सर्व शिक्षक स्टाफ व बहुसंख्य विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.