
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने दि. १४ जानेवारी, २०२३ शनिवार रोजी देगलूर शहरात भव्य शोभा यात्राचे आयोजन करण्यात आले असुन जिजाऊ जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यासाठी देगलूर शहर व तालुक्यातील सर्व समाज, जाती, धर्माचे, सर्व पक्षाचे सदस्य, सर्व नागरीक बंधु भगिनीनी आजी माजी राजकीय, सामाजिक संघटना पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उत्सवात सहभागी होऊन या ऐतिहासीक शोभायात्रेचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हावेत.
या शोभायात्रेची सुरुवात जिजाऊ चौक देगलुर पासुन शहरातील महापुरुषाच्या स्मारकास वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारका पर्यंत भव्य शोभायात्रा महिला ढोल ताशा पथक, बँड, कळस धारी भगिनी, लेझीम पथक, झेंडे, भजनी मंडळ, वेषभुषा, विविध कला कृतीयुक्त कार्यक्रमासह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या उत्सवाचे आयोजन महिला भगिनींच्या हस्ते होत असून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, लेक वाचवा लेक शिकवा, स्वच्छ भारत, माझे शहर स्वच्छ शहर, झाडे लावा झाडे जगवा, हरित वसुंधरा, पर्यावरणाचे रक्षण प्रदुषण मुक्त वातावरण, लोकसंख्या नियंत्रण, मुलगा मुलगी समभाव आदि सामाजिक संदेश, सांस्कृतिक प्रदर्शन, मानन एकता, सर्व धर्म समभाव या शोभायात्रेतून दाखवुन देण्यात येणार असून, सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती जिजाऊ जन्मोत्सव समिती देगलूर यांच्यातर्फे करण्यात आला.