
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर शहरातील गोकुळ नगर मध्ये राहणारा वेडसर वागणूक असलेल्या एका २६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील गोकुळनगर भागातील बालाजी भुमन्ना मुतेपवार (२६) असे मयत तरुणाचे नाव आहे. बालाजी मुतेपवार हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून निघून गेला होता. तो वेडसर तर होताच शिवाय त्याला दारूची सवय जडलेली होती. या वेडसरपणाच्या धुंदीमध्येच तो लेंडी नदीच्या विसर्जन घाटाकडे गेला व तेथील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असवा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयताचा भाऊ यादव भुमन्ना मुतेपवार यांच्या खबरीवरून देगलुर येथील पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस जमादार राजकुमार मिरदोडे करीत आहेत.