
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर खुर्द :- कंधार व लोहा तालुक्याचे श्रध्दास्थान श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज संस्थान कलंबर खुर्द येथील मंदिर समितीच्या वतीने सर्व जनतेस व भाविक भक्तांना कळविण्यात येते की मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.कळसासाठी बाईलेकीनी कळसाची देणगी देऊन सहकार्य केले आहे.श्री.संत मोतीराम महाराज यांची मुर्ती एका भक्ताने दिलेली आहे.फक्त श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या मुर्ती साठी पैसे नाहीत.१२१००० रूपये जमा करून जयपुर येथून महाराज यांची मुर्ती आणायची आहे. कार्यक्रम दि.१७ डिसेंबर शनिवार व दि.१८ डिसेंबर रविवारी आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणून सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की आपण महाराज यांच्या मुर्ती साठी पैसे खालील फोन पे नंबर वर पाठवून सहकार्य करावे ९५७९७१५२९९ व एस.बी.आय खाते नंबर ४१४५६२२०६१४ आय.एफ.एस.सी.कोड SBIN ००२०६६० सहकार्य करावे असे आवाहन श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज व श्री.संत मोतीराम महाराज संस्थान व समस्त गावकरी मंडळी कलंबर खुर्द ता.लोहा जि.नांदेड यांनी केले आहे.धर्म कार्यास हातभार लावला तर खूप मदत होईल.