
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्याचे ग्रामदैवत श्री अलमप्रभू देवस्थान यात्रेस श्रींची रथावरून मिरवणूक काढून प्रारंभ करण्यात आला. शहरातील दत्त मंदिर येथून श्रींची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी अलमप्रभू देवस्थान ट्रस्ट, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,भाविकांनी श्रींची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी धनंजय शेटे , संदीप गाढवे, राकेश जाधव, महेश मनगिरे, माजी नगरसेवक संजय पवार, संजय देवडीकर, सागर टकले, आश्रुबा नाईकवाडी, उद्योजक संजय साबळे, वस्ताद मामू जमादार, उद्योजक सुरज गाढवे, बाळासाहेब सुर्वे, शब्बीर सय्यद, रामभाऊ बागडे ,सूनील थोरात, सुनील माळी , ट्रस्ट ऍड. शाळू, गवळी, श्रीराम भोसले,नितीन होळकर यांच्यासह देवस्थानच्या ट्रस्टीचे सदस्य भाविक उपस्थित होते.