
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
राजूरा
राजुरा शहरालाच लागून असलेल्या गावात आज सकाळी पहाटे 9.30 वा शुल्लक वादातून महादेव कोडापे ह्याला गावातील युवकाने सुरीने वार करून केले जखमी.जिल्हा उपरुग्णालय येते गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. घाव गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले . चंद्रपूर नेत असताना त्याची प्राणज्योत मावळली.
बामणवाडा येथे वादाच्या घटना नेहमी घडत असून त्याला कारण गावात मिळणारी अवैध दारू ,गावात जुगार व दारू बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ह्याच मार्गाने अनेक अवैध धंदे सुरू असल्याने गावात पोलिस चौकी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.