
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मठा
दोन ते तीन दिवसांपासून वातावरण बदलत असून आकाशात ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगाचे प्रादुर्भाव होत आहे.त्यामुळे हरभरा पिकावर अळी पडली व फुल गळत आहे तुवरच्या शेंगावर अळी आणि फुल गळती होत आहे.
गहू भाजीपालावर्गीय पिकावर ढगाळ वातावरण
निर्माण झाले. त्यामुळे पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव
सुरु झाला. त्यामुळे शेतकरी विविध पिकांवर किटकनाशक औषधीची फवारणी करीत आहेत.
अशाच प्रकारे मंठा तालुक्यातील
आकाशात ढगाळ वातावरणात (केहाळ वडगाव ) परिसरात हरभरा, पिकावर किटकनाशक औषधीची फवारणी करतांना घेतलेले छायाचित्र.