
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलुर तालुक्यातील रहीवाशी असलेले जावेद अहमद यांची राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वांनुमते निवड करण्यात आली ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत) महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश सिंह यांच्या नेतृत्वाखाली ५ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत देगलुर तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी लेखनीच्या माध्यमातून सदैव सामाजिक शैक्षणिक संस्कृतीक सामाजिक घटकांचा लेखनातुन एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करून पत्रकार क्षेत्रात चांगली भूमिका रोखठोक लेखनीची उत्तम कामगिरी बजावली असून त्या अनुषंगाने ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे जगदीश सिंह व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप देसाई भालेराव यांनी नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी सोपवली आहे या नीवडीचे देगलुर बिलोली तालुक्यातील सर्वच स्तरातून पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.