
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर; भारता मध्ये आय ए एस परीक्षेमध्ये सातवा क्रमांक मिळवलेले सैम्या शर्मा यांची आज निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला .काही दिवसापूर्वी देगलूर उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते त्यांनी जेव्हा पदाचा कार्यभार हाती घेतला त्यावेळी देगलूर शहरातील व परिसरातील अवैध्य धंद्याचा धुमाकूळ माजला होता ते पाहून मॅडम सर्व अवैध धंद्यावर आळा बसून भरपूर प्रमाणात ओव्हरलोड वाळूचे टिप्पर जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली त्यांच्या या कार्यावर नांदेड जिल्ह्यातील सर्व वाळू माफियाचे धाबे दणाणले होते सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण मॅडमनी या लोकप्रतिनिधींना न जुमानता आपले कार्य चालू ठेवून देगलूर मध्ये एक नवीन आदर्श
दाखवून दिला. येणाऱ्या नवीन जे अधिकारी येथील त्यांनी जर सोम्या शर्मा मॅडमच्या पावलावर पाऊल टाकून देगलूर परिसरातील व देगलूर शहरातील अवैध धंद्यावर आळा बसवण्याचा काम केलं पाहिजे असे देगलूर तालुक्यातील नागरिकांच्या मध्ये चर्चा होत आहे.
त्यांच्या या निरोप समारंभाला देगलूर तहसीलचे तहसीलदार श्री राजाभाऊ कदम बिडिओ जाधव साहेब व सर्व महसूल कर्मचारी देगलूर मधील प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते .