
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा कधी थंडी, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण, या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर
परिणाम होत आहे. घरोघरी सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण दिसू लागले
आहेत. आजघडीला मेडिकलमध्ये सर्दी, खोकल्याचे औषध घेणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत.मंठा शहराबरोबरच ग्रामीणभागात व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने सर्दी तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून यापासून काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. गत आठवडाभरापासून वातावरणात बदल व ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याचा दमा आजाराच्या रुग्णांवर परिणाम दिसून येत आहे.