
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड येथील विसावा पॅलेस येथे आयआयबी प्रस्तुत दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव सोहळा 2022 चा एक्सलन्स अवॉर्डच्या रूपाने साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण नांदेड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत करण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा अंतर्गत सर्वोत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. या गौरवामध्ये व्यक्ती व संस्थांना मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
या सोहळ्यात सह्याद्री शैक्षणिक संकुलाला बेस्ट स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आला .या कार्यक्रमाप्रसंगी सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संचालक सुदर्शन शिंदे सर , सह्याद्री ग्रुप ऑफ इन्सटीट्युचे प्रा नागेश हिरास सर ,साई कुमार दहिवाळ सर यांना हा पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संचालक सुदर्शन शिंदे सर व त्यांच्या संकुलातील सर्व टिमचे तालुकाभरासह जिल्ह्यभरातुन कौतुक केले जात आहे.