
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शहरात मागील अनेक दिवसांपासून खाज सुटून केस गळणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालत या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
शहरातील अनेक भागात मोकाट काही श्वानांच्या अंगाला तीव्र खाज सुटून त्वचा लाल होणे, त्वचा खराब होणे, खराब झालेल्या त्वचेमध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण विकसित होऊन त्वचा जाड होणे, अंगावरील केस गळणे, उग्रवास येणे अशा प्रकारची लक्षणे दिसत असून संक्रमित श्वानांची संख्या दिवसेंदिवस शहरात वाढत चाललाय आहे
विशेष म्हणजे हे संसर्गजन्य रोग असल्याने या संक्रमित कुत्र्यांच्या रोग संपर्कात येणाऱ्या इतर कुत्र्यांनाही च्या याची लागण होत असल्याने अशा नाही संक्रमित कुत्र्यांची संख्या मागील एक अश वर्षापासून शहरात झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. हे मोका श्वान सकाळी शाळेला जाणारी मुले व एक ढ मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ का नागरिकांवर तसेच रात्रीच्या वेळी एकतले येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. या श्वानांचा पालिका क प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.