
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- तहसील कार्यालय कंधार येथील पुरवठा विभागातील छोट्या मोठ्या कामासाठी जसे आर.सी. मध्ये नाव वाढवणे अथवा कमी करणे , नवीन आर.सी.तयार करणे,काही कारणास्तव बंद झालेले राशन कार्ड चालू करण्यासाठी व इतर छोट्या मोठ्या कामासाठी तेथील कर्मचारी (संगणक चालक) श्री देशमुख साहेब यांना ४०० ते ५०० रुपये लाच द्यावी लागते.नाही दिल्यास कोणतेही काम होत नाही,अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष गजानन जाधव यांनी निवेदनाद्वारे माहिती देऊन विनंती केली आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब नांदेड यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.गोरगरीबांची होणारी लूट थांबवून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.