
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
देगलूर:दी. १3/१२/२०२२ वार मंगळवार रोजी जिल्हा क्रिडाधिकारी नांदेड यांनी आयोजित केलेल्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील विविध शाळांनी यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतून *ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल च्या इशांत सोनार या विध्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 17 वर्ष* वयोगटातून निवड झाली. प्रती स्पर्धकाला हारवत या विध्यार्थ्यांने आपली निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. रमेशजी बिरादार सर, श्री. सुजीत बिरादार सर, प्राचार्या पल्लवी जगताप, व्यवस्थापक रामेश्वर सगरे सर व शाळेतील सर्व शिक्षकव पालकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शूभेछा दिल्या. त्यांना क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे व विशाल कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.