
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई :- येत्या १९डिसेंबर पासून राज्याचे पुरवणी मागण्यासाठी चे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होते आहे त्या अनुषंगाने त्या अधिवेशनामध्ये पैशाची तरतूद करण्यासाठी आपल्याला कॅबिनेटमध्ये जाण्याची गरज होती म्हणून आजची झालेली कॅबिनेटची मिटींग आहे ती राज्यातील तमाम ६०,००० हजार शिक्षकांसाठी आनंदाची बाब आहे
दुसरी गोष्ट अघोषित शाळा व तुरटीपात्र शाळांच्या याद्या या आठवड्या अखेर त्यांचा शासन निर्णय निर्गमित होईल
तिसरी गोष्ट
तुर्टीपात्र शाळांना कोणता टप्पा मंजूर झाला आहे हे आपल्याला रात्री उशिरापर्यंत कळेल
४०% वाल्यांना ६०% हे अखेर मंजूर झाले आहे
चौथी गोष्ट आपण समजून घ्यावी दिनांक १९डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या पुरवण्या मागण्या मंजूर होऊन त्यामध्ये आपणासाठी लागणारा साधारण अकराशे कोटी रुपयांचा निधी त्या दिवशी मंजूर होईल व त्याच त्याचे निधी वितरणाचा शासन निर्णय हा ३१ डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्गमित होऊन आपल्या खात्यावर साधारणता फेब्रुवारीच्या पगारामध्ये सर्वांना पगार होईल.