
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या प्रश्नासाठी केलेले अंदोलन स्थगित करावे सरकार चर्चेसाठी तयार आहे असे पत्र शशिकांत तरंगे अध्यक्ष-धनगर ऐक्य परिषद यांना दिले शिष्टमंडळ घेऊन बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बोलवले त्यावेळी अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या काहींनी कमेंट केल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू नका बारामतीच्या आंदोलनात तुम्हाला उपोषण सोडताना शब्द दिला तो पाळला नाही त्यामुळे ते लबाड आहेत वगैरे वगैरे आता मला प्रश्न पडला की महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यावर कोणत्या पक्षावर आपण विश्वास ठेवला तर आपल्या समाजाचे प्रश्न सुटतील अशा पक्षाचे किंवा अशा नेत्याचे नाव तरी सांगा की ज्याकडे जाऊन आपले प्रश्न सोडवून घेऊ शकतो.
75 वर्षात तुम्हाला काय एकाच पक्षाने फसवलं का अनेकांनी फसवलं तरी देखील तुम्ही फसला हे आपण मान्य करत नाही सगळ्यांनी आळीपाळीने तुमची वाट लावली हे माहीत असताना देखील तुम्ही काय केले त्यांचे
अरे त्यांना साधा तुम्ही विरोध करू शकत नाही एवढे प्रेम तुमचे तुमच्या तालुक्यातील नेत्याच्या आडून त्याचं त्याच त्याच हो त्याच ज्यांनी समाजाला फसवले म्हणताना त्यांनाच निवडून देता त्यावेळी कुठे जातो तुमचा स्वाभिमान अभिमान का तुमचा स्वाभिमान फक्त समाजाच्या प्रश्नावरती आवाज उठवणाऱ्यांनाच शहाणपणा शिकवताना जागा होतो का?
विचार करा जरा आपल्या नेत्यांना मोठे करण्यासाठी फक्त 3% समाज पुढे येतो सहकार्य करतो बाकी 97% समाज कोणाचा गुलाम आहे यावर सुद्धा बोलले पाहिजे आपण निवडणूक लढली तर आपण प्रमुख पक्ष्यांच्या नेत्यांशिवाय मतदान करत नाही आणि प्रमुख पक्ष आपल्याला उमेदवारी देत नाही तरी आपण लाचार व्हायचे आपल्या आपल्या गावातील पोलिंग बुधवर सुद्धा आपण स्पर्धा लावतो मी जास्त मतदान देतो का तू जास्त मतदान देतो माझ्या बूथ वरून लीड का तुझ्या बूध वरून लीड यावर आपण 75 वर्षात कोणाचं तिकीट देत नाही उमेदवारी देत नाहीत त्यांना मातीत घालवण्यासाठी आपण कधी लढत नाही चर्चा सुद्धा करत नाही याची लाज वाटते.
अनेक जण म्हणतात समाजाच्या नेत्यांनी समाजाचे वाटोळ केले मी म्हणतो जहागीरदारांच्या व पैसेवाल्यांच्या मागे फिरण्यासाठी समाजातील काही वर्गाने समाजातील प्रामाणिक नेत्यांचे देखील वाटोळे केले आहे. करा चिंतन या गोष्टीचे देखील म्हणून आज आपल्याकडे त्याच त्याच नेत्यांवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यांनी त्यांनी घोषित केलेले निर्णय यावर कधी अंमलबजावणी होणार हा प्रश्न हा जाब विचारण्यासाठी आंदोलन उभा केलं आणि आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाचा सर्वच राजकीय पक्षांना सर्वच नेत्यांना तुम्ही ज्या पक्षाला मतदान करता तुम्ही ज्या नेत्यांबरोबर काम करता त्या सर्वांना धनगर समाजाचा विसर पडला होता तो प्रश्न धनगर ऐक्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणून सगळ्या राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आणला आणि आज या प्रश्नाला एक गती देण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नेतृत्वाखाली धनगर ऐक्य परिषदेच्या समन्वयक सदस्यांबरोबर बैठक केली अनेक प्रश्नांचा बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
निश्चितपणे लढणं हे आपल्या हातात आहे परंतु जे देणार आहेत त्यांच्याबरोबरचा संघर्ष हा सातत्याने चालू ठेवणं लढा हा लढल्याशिवाय न्याय मिळाल्याशिवाय बंद न करणं हे आपल्या हातात आहे आणि निश्चितपणे आपण काम करत असताना आपल्या माणसांवर टीका टिप्पणी आरो प्रत्यारोप करणे आपण आपल्या माणसांचे खच्चीकरण करण्यापेक्षा साथ द्या ज्यांना साथ देता येत नसेल त्यांनी गप्प बसा ज्यांना गप्प बसता येत नसेल त्यांनी राज्यातले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती काम करा परंतु आपण तिथे डोकं न घालता आपल्या आपल्या मध्ये ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्न करता म्हणून आम्ही ठरवलं की कोणाला आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांना टीका टिप्पणीतून उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं जे आम्हाला या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करतात ज्यांची फडफड जळजळ मळमळ होतेय आशा लोकांना कामातून उत्तर देणार.