
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
आंतरवाला गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करावा व विकास कामाचे प्रस्ताव सादर करावेत. यासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी *राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आंतरवाला येथील स्मशानभूमी बांधकामासह विविध विकास कामाच्या भूमीपासून प्रसंगी सांगितले* आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी अंतरवाला येथे अर्जुनरावजी खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत स्मशानभूमी बांधकामासाठी सात लाख रुपये मंजूरी मिळालेल्या कामाचे व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पानंद रस्त्याचे तसेच इंदिरा आवास योजनेच्या 30 रमाई घरकुल मंजूर असलेल्या कामाची भूमिपूजन शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर बाजार समितीचे माजी संचालक बाबा मोरे , सरपंच बळीराम शिंदे, गणेशराव शिंदे, प्रभाकरराव सुळसुळे ,अशोकराव सुळसुळे ,बठाणचे उपसरपंच रामेश्वर देवडे ,कुंबेफळ चे सरपंच राहुल गवारे, शिरसवाडी चे सरपंच रवींद्र ढगे, दादाराव लहाने ,सुरेश काळे ,उपसरपंच रवींद्र काळे ,जनार्धन बचाटे, अंबादासराव शिंदे, नारायणराव शिंदे ,बाबासाहेब उघडे ,बालकुमार सुळसुळे, मिठाराम सुळसुळे, रामेश्वर सुळेसुळे,बबनराव सुळसुळे, सामनगाव येथील योगेश चिरखे, लंकेश्वर चिरखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते