
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदिवासी जिल्ह्यातील विशेष दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत १० डिसेंबर रोजी संपन्न झाल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर व समाज कल्याण अधिकारी प्रवीण भावसार हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील १६ विशेष शाळा या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.जव्हारच्या प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल.मुर्डेश्वर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सर्वच क्रीडा स्पर्धात निर्विवाद वर्चस्व मिळवून ५०,१०० आणि २०० मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.लांबउडी खेळ प्रकारात मुले व मुली प्रथम क्रमांक तर गोळाफेक आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून शानदार विजय प्राप्त केला आहे.अशा प्रकारे विविध वयोगटांनुसार झालेल्या या स्पर्धेत विशेष दिव्यांग शाळेतील मुलांनी एकूण १६ पारितोषिके मिळवून विजयी पताका फडकवकी.यामुळे या दिव्यांग विद्यार्थ्यांवर चहूबाजूने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.