
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी बीड – संभाजी गोसावी
जिल्ह्यातील ( ता. धारुर) भोगलवाडी गावचे सुपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रांतील चाहत्यांना खळखळून हसवणारा सिनेस्टार टिक-टॉक संतोष भाऊ मुंडे यांचे विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी भोगलवाडी येथे घडली. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून धारुर तालुक्यांतील भोगलवाडी येथील सिनेस्टार संतोष मुंडे व त्यांचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी येथे काळेची वाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डीपीचे फयुज टाकण्यासाठी गेले असता यावेळी अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्यामुळे या दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष मुंडे यांनी टिक-टॉकच्या माध्यमांतून आपली वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात चांगलीच लोकप्रिय गाजवली होती. आपल्या विनोदी शैलीने त्यांना लाखो फोलो निर्माण झाले होते. हसत-हसत ग्रामीण जनतेच्या समस्या वाशीला टांगणारा ग्रामीण व अस्सल मराठवाड्यांच्या बोली भाषेतून आपल्या अभिनयांने खळखळून हसवणारा संतोष मुंडे भाऊ आज चाहत्यांना रडून गेला अशीच काहीशी अवस्था बीडकरांची झाली. संतोष भाऊ मुंडे सिनेस्टार टिक-टॉक यांच्या अचानक जाण्यांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रांतील चाहत्यांवर शोककळा निर्माण झाली. संतोष भाऊ मुंडे यांनी आपल्या कलेतून मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेची कामेही व आपल्या विनोदी शैलीतून शेतकरी बांधवांसाठी तसेच बँका तसेच प्रशासकीय कार्यालय व प्रशासकीय अधिकारी यांच्या बद्दल आपल्या शैलीतून त्यांनी व्हिडिओ तयार करुन लोकांचे प्रश्न देखील मार्गी लावले होते. त्यामुळे त्यांचा बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात चांगलाच परिचय होता.