
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
तळेगाव ढमढेरे येथील समाजकार्याची जाण व भान असणारे, कृतिशील कार्यकर्ते म्हणून मुरलीधर विश्वनाथ भुजबळ यांची ओळख आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत.त्यांची समाजाविषयी असणारी तळमळ आणि समाजासाठी कार्य करण्याची धडपड नेहमी असते.त्यांनी आजपर्यंत रेशीम गाठी वधू वर सूचक केंद्र स्थापन करून त्यांनी आजपर्यंत माळी समाजाबरोबरच अन्य समाजातील शेकडो विवाह जुळविले आहेत.यासाठी त्यांनी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेतली नसून, समाज कार्याची आवड म्हणून त्यांनी हे कार्य केले आहे.रेशीम गाठी वधू वर सूचक केंद्र याच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे आणि त्यांना मानणारा लोकवर्ग खुप मोठ्या प्रमाणात आहे.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची माळी महासंघ महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे, त्यांची ही निवड माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व विश्वस्त आण्णा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे यांनी केली आहे.
संघटनेचे ब्रीद वाक्य समाज कार्यासाठी समाज संघटन हे वाक्य धरून समाज एकत्रित करण्याचे कार्य करतो. आणि महात्मा फुले आणि सावित्रीआई यांच्या सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्याचे काम माळी महासंघ करते.असे या वेळी बोलताना मुरलीधर भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले.
मुरलीधर भुजबळ यांच्यावर आलेली जबाबदारी त्यांच्या समाजकार्याला गती देणारी ठरणार आहे म्हणून त्यांच्या निवडी बद्दल ॲड, नितीन राजगुरू, माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत वाघोले यांनी विशेष अभिनंदन केले आहे.त्याच बरोबर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.