
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बॉलीवुड मधील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रिटेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा.. रितेशने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकलीच पण जेनेलियाने देखील रितेश सोबत आपले उत्तम सहजीवन करून त्याला साथ देऊन सर्वांच्या मनात घर केले आहे.
बॉलीवुडमध्ये त्यांचे कपल हे आयडियल मानले जाते. लवकरच ते दोघेही ‘वेड’या चित्रपटामध्ये बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी ‘सकाळ – स्वास्थ्यम्’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी जेनेलीयाने रितेशसाठी एक खास उखाणा घेतला.
जेनेलिया आणि रितेश देशमुख ही मराठमोळी जोडी अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठे व्हायरल होत असतात. अशात ‘स्वास्थ्यम्’ या सकाळ माध्यम समूहाच्या ‘Global Wellness’ उपक्रमात रितेश आणि जेनिलियाने त्यांचे फिटनेस सीक्रेट आणि आनंदी जीवनाचा मंत्र वाचकांना शेअर केला. पण यावेळी जेनिलियाने रितेशची खास मराठमोळा उखाणा देखील सादर केला.
यावेळी जेनेलियाला उखाणा घेण्याची फर्माईश करण्यात आली. त्यावर जराही आढेवेढे न घेता अत्यंत लाजत – हसत जेनेलियाने रितेशचे नाव घेतले. उखाणा घेताना ती म्हणाली,
”रितेश.. तुम्ही माझ्या सोबत असलात की स्वतःच्याही आधाराची गरज नाही.. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा.. मी दुसरं काही मागत नाही..”
तिच्या या उखण्याने सर्वांची मनं जिंकली..
गेल्या काही महिन्यांपासून ज्या मराठी चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो ‘वेड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या प्रेमाचं वेड या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेम आणि वेड दोन भावनांचा खेळ या चित्रपटात दिसणार आहे. रितेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे तर तो आणि जेनेलिया प्रमुख भूमिकेत आहेत.