
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सध्या चांगला चर्चेत आला आहे. काही दिवसापूर्वीच चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाले होते.
ज्यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची बोल्ड केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. या बोल्ड सीनमुळे शाहरुख आणि दीपिकाला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते. मात्र आता या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या ड्रेसवरुन वाद रंगला असून हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधातील आंदोलन करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर बोल्ड सीन आणि भगव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत या हे आंदोलन करण्यात आले आहे. वीर शिवाजी नावाच्या गटाने छेडलेल्या या आंदोलनात शाहरुख खान आणि दीपिकाच पुतळे जाळण्यात आले असून या गाण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
‘पठाण’ चित्रपटातील या गाण्यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या ड्रेसवर आक्षेप नोंदवला असून गाण्यातील बेशरम रंग या ओळींबद्दलही त्यांनी नाराजी दाखवत गाण्याचे बोल आणि कपड्याचा रंग बदलण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास हा चित्रपट मध्यप्रदेशमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही असा ईशाराही भाजपा मंत्र्यांनी दिला आहे.
दरम्यान, पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाणे प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हिंदू महासभेनेही या गाण्यावर आक्षेप नोंदवत गाण्याचे बोल आणि कपड्यांच्या रंगावरुन निर्मात्यांना इशारा दिला आहे. या गाण्यामुळे भगव्या रंगाचा अपमान झाल्याचे मत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केले आहे.