
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर उपाध्यक्ष अफजल अली यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा सचिव रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वाखाली CEO काटकर यांना निवेदन देन्यात आले कि टेकडी विभागातील सफाई कर्मचारी संख्या वाढविण्याचे करावे, यूथ व cyss पदाधिकाऱ्यांनि प्रभागाचे सर्वेक्षण करताना नाल्यांची साफसफाई होत नाही, सफाई कामगार नेहमीच येत नाहीत, अशा विविध समस्या नागरिकांकडून मांडण्यात आल्या होत्या, या समस्यांची दखल घेऊन निवेदन देन्यात आले. तसेच मक्का मशीद रोडला लागून असलेल्या चेंबरचे पानी भरून रोडवर वाहणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबतही त्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी शहर सचिव ज्योती बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ शेख जी, cyss सह-प्रमुख आशिष गेडाम जी, सुधाकर गेडाम जी, बेबी बुरटकर जी आदी क्रांतिकारी साथीदार उपस्थित होते.