
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा – संभाजी गोसावी
जि. पुसेगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सध्या मोटारसायकलच्या चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढू लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या कार्यकाळामध्ये पुसेगांव पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी पदभार स्वीकारला असून. त्यांच्या धडक कारवाईमुळे पुसेगांव नगरीतील अवैध-धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. यामध्ये पुसेगांव पोलिसांनी मोटार सायकल चोरी प्रकरणी एका सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत पुसेगांव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीवरुन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या आदेशावरुन मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यांचे आदेश पुसेगांव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे आदेश आल्यांने श्री. संदीप शितोळे साहेब पोलीस निरीक्षक यांनी सर्वप्रथम विशेष पथक तयार करुन गुन्ह्यांच्या अनुषंगाने घटना स्थळी भेट देवुन पाहणी करुन आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता.तसेच तांत्रिक विषेनाद्वारे गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगांव पोलिसांनी दोन संशयितांस ताब्यांत घेवुन त्यांच्याकडूंन वरील प्रमाणे चोरीस गेलेली १०.००० / रुपये किमतीची स्प्लेंडर त्यांच्याकडूंन सदर आरोपीकडून ०३ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. सदर आरती वर पुसेगाव दहिवडी व सातारा तालुका या पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून या सराईत आरोपीस पकडण्यांत पुसेगांव पोलिसांना यश मिळाले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, दत्ता जाधव ,दीपक बर्गे ,सुनील अंबदागीरे,दौलत कुदळे, सचिन जगताप यांच्यासह आदीं पुसेगांव पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्याकडूंन कौतुक.