
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/सेलू : तालुक्यातील वालूर येथील अज्ञात चोरांनी दोन दुकाने फोडून लाखांची रोकड व सामान लुटून पोबारा केला. ही घटना आज गुरुवार, दि १५ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली. घटनेची खबर लागताच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे व वपोनि. रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली.
आठवडी बाजार परिसरातील लक्ष्मी ट्रेडर्स व राजश्री मेडीकल ही दोन दुकाने १४ तारखेला रात्री बंद करुन दुकान मालक घरी गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरांनी केलेली ही दुकाने फोडल्याचा प्रकार आज गुरुवारी सकाळी उजागर झाला. लक्ष्मी ट्रेडर्स मधून एक लाखाची रोकड व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरुन नेले तर समोरच्या मेडीकल मधून मोठ्या प्रमाणात किमती सामान व सीसीटीव्ही आणि डीव्हीआर लंपास केले ज्यामुळे चोरी केल्याचे पुरावे हाती लागू नये दक्षता चोरांनी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान या घटनेतील लिप्त चोरांचा माग काढता यावा यासाठी श्वानपथक व फिंगर प्रिंट विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.